नाशिक- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढण्यात येतील. जिथे महायुती होणार नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील, असे संकेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. एका कुटुंबात मतप्रवाह असू शकतात, असे सांगताना शिवसेनेत कोणताही गटबाजी नाही, असा दावा त्यांनी केला.