कांदा दरवाढीचे आकांडतांडव नको : कृषिमंत्री दादा भुसे

कांदा अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे विकला गेला, तरच शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहतात.
Agriculture Minister Dada Bhuse
Agriculture Minister Dada BhuseSakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कांदा मातीमोल विकला जातो, तेव्हा शेतकऱ्यांविषयी सहानुभूती दाखविली जात नाही. मग आता थोडी दरवाढ झाली, तर आकांडतांडव करू नये. कांदा अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे विकला गेला, तरच शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहतात. महाविकास आघाडीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळला असून, राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी वर्ग केली असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

पिंपळगाव बसवंत येथे साधना मिसळ शाखेच्या उदघाटन समारंभानिमित्त आले असता ते बोलत होते. आमदार दिलीप बनकर प्रमुख पाहुणे होते. मंत्री भुसे म्हणाले, की कांदा न खाणारेच भाववाढीवरून जास्त गरळ ओकत आहेत. शेतकरी परतीच्या पावसाने त्रस्त आहेत. पर्यावरणातील बदलामुळे ढगफुटी, निसर्ग, गुलाब या वादळांनी शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशा संकटात राज्य शासनाने आठ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कृषी विभागातर्फे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतीमालाची विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. निर्यातक्षम शेतीमाल पिकविण्याबरोबरच उत्पादक ते ग्राहक यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेती सक्षमीकरणासाठी एक हजार गटसमूह व कंपन्यांना कृषी विभागाने परवानगी दिली असल्याचे भुसे यांनी सांगितले. पिंपळगाव बाजार समितीचे माजी सभापती तानाजी बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना कांदे भरलेली बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली व निर्यात खुली ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा आग्रह धरला.

Agriculture Minister Dada Bhuse
नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान; शहरात डेंगीचे ९२० रुग्ण
Agriculture Minister Dada Bhuse
टाटाची सर्वात स्वस्त SUV लाँच, 21 हजार रुपयांत करता येईल बुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com