Dada Bhuse : रोजगार हमीच्या प्रत्यक्ष कामांची संख्या वाढवा : दादा भुसे

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal

Dada Bhuse : रोजगार हमीच्या कामांची संख्या वाढविली जावी. उन्हाची तीव्रता वाढत असतांना कामांची संख्या वाढवून मजूरांना कामे उपलब्ध करून ठेवावीत, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी आज येथे दिल्या. (Dada Bhuse statement Increase number of direct jobs guaranteed by employment nashik news)

नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात आज (ता. १९) जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना आणि पाणी टंचाई संदर्भात श्री. भुसे यांनी आढावा घेतला. आमदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल, उपवनसंरक्षक उमेश वावरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, मनरेगांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये घरकुल, सार्वजनिक शौचालय, विहिरी या व्यतिरिक्त इतर कामे देखील घेण्यात यावीत. त्यात आदर्श शाळा, शाळांच्या संरक्षक भिंती, साखळी बंधारे अशा विविध मनरेगांतर्गत १०१ कोटींचा खर्च केला.

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जमिनीची पाणी पातळी वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तेथे जलयुक्त शिवार अभियानातून बंधारे बांधण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse news
Nashik News : जिथे प्रकल्पांना विरोध, तिथेच होताय संच!

झिरवाळ म्हणाले की, शासनाच्या योजना राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांच्या उद्घघाटनप्रसंगी देखील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत.

तसेच पूर्ण झालेल्या गावनिहाय कामांची सद्यःस्थिती व वस्तुस्थतिदर्शक अहवाल संबंधित यंत्रणेने सादर करावा अशा सूचना दिल्या.

बैठकी दरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जलयुक्त शिवार अभियानाबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते व जलजीवन मिशनबाबत जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

तालुका कामे मजूर उपस्थिती सेल्‍फवर कामे मजूर क्षमता

बागलाण ७१ १०६३ ४६७ २०१०००

चांदवड २५ २५७ १०४२ १०६२४०

देवळा १११ ६२८ ५०८ १५८८०७

दिंडोरी ३१ २०३ ११९५ १६२५९६

इगतपुरी ३३२ १३०४ १०५९ ११०८९८

कळवण १४० ६१२ ४८० ५२६८२

मालेगाव ७५ ६८२ १००३ ३४१७६६

नांदगाव १२५ १२२४ २२९ ८९३७१

नाशिक ७४ २९० ७०२ ४८४६०१

निफाड ८९ ९३० ४२४ ८५२९०

पेठ १९० १२०० ३४६ ५८७१६

सिन्नर ८२ ५५३ १०७९ ११३४६०

सुरगाणा १३८ ५९९

२२३ २४६४३३

त्र्यंबकेश्वर ४३ १८९ २०५१ ३३३२७१

एकूण १८७८ ११५५६ ११३५६ २९५९९३६

Dada Bhuse news
Nashik News : महापालिकेची झोळी फाटकी तरीही भूखंड इमारतींची खैरात! उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com