Dada Bhuse: प्रशासकीय सेवेमध्ये शेतकऱ्यांची मुले दाखल होताहेत याचा सर्वाधिक आनंद : दादा भुसे

Guardian Minister Dada Bhuse felicitating the candidates who passed the Maharashtra Public Service Commission examination
Guardian Minister Dada Bhuse felicitating the candidates who passed the Maharashtra Public Service Commission examinationesakal

नाशिक : शेतकऱ्यांची मुले प्रशासकीय सेवेत येताहेत याचा मला सर्वाधिक आनंद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा सत्कार श्री. भुसे यांच्या हस्ते झाला.

यावेळी ते बोलत होते. सरकारी विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (Dada Bhuse statement on Farmers children join administrative service nashik news)

श हे अंतिम नसून यशाला गवसणी आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करत राहावी लागते, असे सांगून श्री. भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांचा संघर्ष मी बघत आलोय. कष्ट आयुष्यात कायम सुरू ठेवा, जनतेसाठी वाहून घ्या.

तुमच्या कार्याच्या कौतुकाने तुमच्या पालकांना अभिमान वाटेल असे काम करा. भविष्यात काम करण्याची चांगली संधी आली आहे. त्याचा फायदा जनतेला करून द्या, आयुष्यात आपल्या चारित्र्यावर डाग लागणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहून प्रामाणिकपणा जपा.

समाजात काम करताना आपल्याकडे एखादी व्यक्ती काम घेऊन येते, त्यावेळी त्यांना गरजू समजू नका. त्यांच्या जागी आपण स्वत:ला ठेवून काम करा. ते काम केल्याचे समाधान तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा देईल.

त्याचप्रमाणे ठरवलेल्या कामाच्या चौकटीतून बाहेर पडा. आपल्या कामाचे वेगळेपण सिद्ध करा. आपल्याकडे असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर समाजाला होईल. यासाठी प्रयत्नशील रहा, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Guardian Minister Dada Bhuse felicitating the candidates who passed the Maharashtra Public Service Commission examination
Nashik News : श्रीभगवतीची पंचामृत महापूजा; चैत्रोत्सवात लाखो भाविक आदिमायेचे घेणार दर्शन

सत्कारार्थी उमेदवार

० तेजस्विनी प्रफुल्ल आहेर

० दुर्गा देवरे

० ऋतुजा जयवंतराव पाटील

० अक्षय संजय पगार

० जयेश प्रशांत देवरे

० गौरव सोनवणे

० पूनम भिला अहिरे

० तृप्ती संभाजी खैरनार

Guardian Minister Dada Bhuse felicitating the candidates who passed the Maharashtra Public Service Commission examination
Nashik : येवला मतदारसंघातील 47 कोटींच्या विकासकामांची स्थगिती उठविणार! सरकारी वकिलांची उच्च न्यायालयात माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com