नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे ‘विशाखा काव्य पुरस्कार २०२४ जाहीर केले आहेत. कवयित्री सुनीता डागा (रा. वडगाव शेरी, जि. पुणे) यांच्या ‘तुझं शहर हजारो मैलांवर’ या काव्यसंग्रहाची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे सागर जाधव जोपूळकर (ता. चांदवड), यांच्या ‘माती मागतेय पेनकिलर’ आणि कवी गौतम ढोके (रा. बडनेरा, जि. अमरावती) यांच्या ‘दंगल होतेच कशी?’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.