कृषी विज्ञान केंद्रातर्फे आणंद येथे दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्रातर्फे आणंद येथे दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण
Published on: 
फोटो : NSK26H33259 आणंद ः दूध प्रकल्पाला भेट देताना खांडबारा परिसरातील शेतकरी. ------------ कृषी विज्ञान केंद्रातर्फे दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण नंदुरबार, ता. २३ : दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ आणंद (गुजरात) येथे पाचदिवसीय प्रशिक्षण पार पडले. येथील ‘आत्मा’ व नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रातर्फे हे प्रक्षिक्षण झाले. प्रशिक्षणात खांडबारा परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्रांतर्गत जिल्ह्यातील खांडबारा (ता. नवापूर) परिसरात ‘सिलेज आधारित परिसर विकास प्रकल्प’ राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके होतात. खांडबारा परिसरात दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी गीर गायीला प्रोत्साहन, सुधारित चारा पिकांची लागवड, खनिज मिश्रणाचा वापर, कडबा कुट्टी यंत्राद्वारे चारा बचत, मुरघास निर्मिती, मुक्त संचार गोठा यासारख्या विविध उपक्रमांचे नियोजन केले जाते. शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन दुग्धउत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. या वेळी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी स्वच्छ दुध उत्पादन गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी दुग्धव्यवसायाला प्रक्रियेची जोड दिल्यास या व्यवसायातून अधिक फायदा मिळू शकतो, असे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. खुशाल राठोड यांनी पशुधनासाठी चारा व्यवस्थापनबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान सहभागी शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायाचे आधुनिक व्यवस्थापन, दुभत्या जनावरांचे संगोपन, संतुलित पशुआहार, चारा व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या पद्धती, स्वच्छ दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता आणि दुग्ध व्यवसायाचे आर्थिक नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीपणे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद करण्यात आला. आणंद येथील अमूलच्या दुग्ध प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com