
Dak Adalat : मुख्य टपाल कार्यालयात शुक्रवारी डाक अदालत
नाशिक : जिल्ह्यातील टपाल विभागात ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी शुक्रवारी (ता.२४) दुपारी चारला मुख्य टपाल कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे. (Dak Adalat at Head Post Office on Friday Nashik News)
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
या डाक अदालतीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक मुख्य डाक घराजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे करण्यात आले आहे. ग्राहकांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले तक्रार अर्ज दोन प्रतीत वरिष्ठ अधीक्षक, टपाल विभागाच्या कार्यालयात 20 मार्च, 2023 पूर्वी सादर करावेत, असे आवाहनही श्री. अहिरराव यांनी केले आहे.
या डाक अदालतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादींबाबत तसेच नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असणाऱ्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निवारण झालेले नाही व याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींचीही या अदालतीत दखल घेतली जाणार आहे.