नाशिक: ऑगस्टच्या पूर्वार्धात जिल्ह्यात मॉन्सूनने ओढ दिली असली, तरी मागील अडीच महिन्यांतील दमदार पावसामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. प्रमुख २६ धरणांमधील साठा ८३ टक्क्यांवर पोहोचला. विशेष म्हणजे ११ धरणे काठोकाठ भरली आहेत, त्यामुळे जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली.