Monsoon Rainfall Doubles Dam Storage in Nashik : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाचे विहंगम दृश्य, जिथे जूनमधील दमदार मॉन्सूनमुळे पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता दूर झाली आहे.
नाशिक- जूनमध्ये जिल्ह्यावर मॉन्सूनने केलेल्या कृपावृष्टीमुळे धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत २६ प्रमुख प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ४७.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यावासीयांकरिता ही दिलासादायक बाब आहे.