नाशिक- शहर पोलिस आयुक्तालयाच्या महिला पोलिसांच्या विशेष दामिनी पथकाने शहरातील टवाळखोरांविरोधात बेधडक कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या सहा महिन्यांत विविध मोहिमा राबवून आयुक्तालय हद्दीतील दामिनी पथकांनी चार हजार ७६५ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.