फोटो : B12904
राणेनगर : हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या दांडिया मैदानात श्री सप्तशृंगी देवीच्या मूळ मूर्तीच्या प्रतिकृतीच्या प्रतिष्ठापनेप्रसंगी
सागर देशमुख, नानासाहेब आढाव, दर्शन कुलकर्णी, गजानन लिपने, जिग्नेश डोमाळे आदी
---
इंदिरानगर-पाथर्डी परिसर दांडियाने गजबजणार
२५ ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा; नवरात्रोत्सवाचा जल्लोष;
इंदिरानगर, ता. ११ : दांडिया हब म्हणून ओळख असलेल्या इंदिरानगर- पाथर्डी परिसरात २५ मंडळांनी दांडीया मैदानात देवीच्या विविध रूपांची भक्तीभावाने प्रतिष्ठापणा केली. गामने मैदानात सह्याद्री युवक मंडळाच्या मैदानात अष्टभुजा दुर्गेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. माजी नगरसेवक अमोल जाधव, माजी नगरसेविका संगीता जाधव, अनिल गायकवाड, अजय दहिया, रवींद्र गामणे, निखिल अलई, शैलेश कार्ले, अजय पाटील आदी उपस्थित होते.
राणेनगर येथे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे सागर आणि पूजा देशमुख यांनी सप्तशृंगी देवीच्या मूळ मूर्तीची प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली. नानासाहेब आढाव, दर्शन कुलकर्णी, गजानन लिपने, जिग्नेश डोमाळे, भूपेंद्र थोरात, आप्पासाहेब शेजवळ, संदीप सोनवणे, धिरज खैरनार, प्रसाद कुलकर्णी, पवन गीत, रवींद्र पाटील, सचिन जोंधळे, राहुल सुर्यवंशी, अंकुश तांबोळी आदी उपस्थित होते. सुचितानगर येथे शिवसेना (उबाठा) उपमहानगरप्रमुख सरप्रीतसिंग बल यांच्या सुचितानगर मित्रमंडळाने देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आश्विन देसले, अध्यक्ष राकेश बोराडे, संदेश वाणी, संकेत मोटकरी, भूषण जाणेराव, विजय पारवे, स्वराज देसले, साहिल पाटील, प्रणव मोरे प्रथमेश नाले आदी उपस्थित होते. पांडुरंग चौकात भाजपचे एकनाथ नवले यांच्या राजे शिवछत्रपती मंडळातर्फेदेखील फक्त महिलांसाठी दांडिया रासचे आयोजन केले आहे. सोनाली नवले यांच्यासह कार्यकर्ते संयोजन करत आहेत. नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांच्या श्री प्रतिष्ठानतर्फे कौटुंबिक दांडिया मैदानात महालक्ष्मीची प्रतिष्ठापना झाली. स्वर्णमंदिर देखावा पुन्हा खुला केला आहे. नरहरीनगर येथे श्री कुंदकेश्वर मंडळाच्या दांडिया मैदानात भगवतीच्या प्रतिष्ठापना करण्यात आली. अजय मित्रमंडळाच्या प्रांगणातील उत्सवात दीपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत देवीची प्राणप्रतिष्ठा झाली. वासननगर उद्यानात राम बडगुजर यांच्या साई राम सेवा संस्थेतर्फे आयोजित दांडिया मैदानातील देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी आकाश खातळे, ऋषी चौधरी, वैशाली कराड,अनिता आव्हाड आदी उपस्थित होते. दांडीया मैदाने सज्ज असली तरी नेहमीच्या अनुभवानुसार तिसऱ्या माळेपासून सर्वच मैदाने मोठ्या बक्षिसांमुळे युवक- युवती आणि महिलांनी तुडूंब भरतील असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक मंडळाला बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली.