नवीन नाशिक: सिडको परिसरातील पवननगर, रायगड चौक, त्रिमूर्ती चौक आणि सावतानगर या भागांत रस्त्याच्या कडेला असलेल्या उंचावलेल्या पाण्याच्या ढाप्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी रस्त्याचे पृष्ठभाग समांतर न राहता पाण्याच्या ढाप्यांमुळे उंचसखल रस्ता तयार झाला असून, दुचाकीस्वारांसाठी हे अपघाताचे ठिकाण ठरत आहे.