येवला- ‘बीओटी’ची टोलवसुली जोरात सुरू असताना मनमाड-कोपरगाव महामार्गावर मात्र ठिकठिकाणी मध्येच डांबराचे उंचवटे येऊन रस्ता खाली-वर बनत खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी तात्पुरती ठिगळे देऊन खड्डे दुरुस्ती होते. महामार्ग व साइडपट्ट्यात अंतर पडल्याने वाहने घसरून सातत्याने अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप करत टोल ठेकेदाराने तत्काळ या समस्या सोडवाव्यात, अन्यथा टोलवसुली बंदसाठी आंदोलनाचा इशारा संभाजी पवार यांनी दिला आहे.