२०-१
दानिश शेखचा
जामिन नामंजूर
नाशिक : बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतरांचा प्रयत्न प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याचा जामिन नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.
देवळाली कॅम्प पोलिसात टीसीएसमधील लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावण्यासह ॲट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. यावर बचाव पक्षाने मंगळवारी (ता. २७) न्यायालयात युक्तिवाद करीत दानिश शेख यास जामीन देण्याची मागणी केली होती. परंतु नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांनी दानिश शेख याचा जामीन अर्ज नामंजूर करीत फेटाळून लावला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संशयित निदा खान, तौसिफ अत्तार यांना जामीन मंजूर केला आहे. टीसीएस कंपनीतील पीडित महिलांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न याप्रकरणी संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख, अश्विनी चैनानी, निदा खान यांच्याविरोधात देवळाली कॅम्प एक व मुंबई नाका आठ असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.