दानिश शेखच्या जामीनावर आज सुनावणी

दानिश शेखच्या जामीनावर आज सुनावणी
Published on: 
३०-२ दानिश शेखच्या जामिनावर युक्तिवाद, आज सुनावणी ---------- टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरण ---------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : बहुचर्चित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीतील लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतरांचा प्रयत्न प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याच्या जामिनावर सुनावणी उद्या (ता. २८) होणार आहे. सरकार व बचाव पक्षातर्फे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. टीसीएसमधील लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावण्यासह ॲट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो गुन्हा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. यावर बचाव पक्षाने आज (ता. २७) युक्तिवाद केला. दानिश शेख यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने व्हिसीद्वारे न्यायालयासमोर हजर केले. तौसिफ बिलाल अत्तार न्यायालयात हजर होता. निदा खान ही प्रसूतीच्या कारणास्तव न्यायालयात गैरहजर होती. संभाजीनगरचा एमआयएमचा नगरसेवक मतिन पटेलही न्यायालयात उपस्थित होता. बचाव पक्षाने दानिशच्या जामिनासाठी युक्तिवाद करताना, पीडिता व संशयितांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगत ही बाब कुटुंबीयांपर्यत पोहोचल्यानंतर खोट्या आरोपांखाली गुन्हा दाखल केल्याचा युक्तीवाद केला. दानिशच्या जामीनाला सरकार पक्षाने यापूर्वीच कडाडून विरोध केला आहे. न्या. खारकर यांनी दानिशच्या जामीनावरील सुनावणी उद्यापर्यंत (ता. २८) ढकलली आहे. .... खरातविरोधात ६ ला सुनावणी दैवी शक्ती, भविष्यवाणीतून भीती दर्शवून महिलांवर लैंगिक अत्याचारासह अनेकांच्या फसवणूकप्रकरणात संशयित भोंदू अशोक खरात विरोधात दोषनिश्चितीबाबत विशेष न्यायालयात आज (ता. २७) सुनावणी होती. मात्र, यावर कोणतेही कामकाज न होऊ शकल्याने त्यावरील सुनावणी येत्या ६ नोव्हेंबरपर्यत पुढे ढकलण्यात आला आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com