मालेगाव- शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. शहरात सामान्य रुग्णालय, सावित्रीबाई फुले महिला बाल रुग्णालय यासह अनेक रुग्णालये आहेत. येथे हद्दवाढ झाल्यापासून सायने बुद्रुकपर्यंत शहराची हद्दवाढ झाली आहे. येथील नागरीकांना महापालिकेतर्फे पाण्याशिवाय दुसरी सुविधा मिळत नाही. दरेगाव हे शहराला जोडणारे केंद्र आहे. या भागात शासनाने शंभर खाटांचे रुग्णालय सुरु करावे अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.