
Nashik : दऱ्याई माता मंदिर परिसराची भाविकांना भुरळ
मखमलाबाद (जि. नाशिक) : नाशिक व परिसरातील डोंगररांगा मुसळधार पावसानंतर (Heavy Rain) हिरावाइत नटल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दऱ्याई माता मंदिर परिसरात मुसळधार पाऊस अन् त्यातून वाहणारे निर्मळ झरे मन प्रसन्न करीत आहेत.
हिरव्यागार घनदाट वनराईच्या या कुशीत पर्यटक व भाविकांची सेल्फी व फोटो काढण्यासाठी गर्दी होत आहे. दरी- मातोरी रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर हे मंदिर आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य खुशीत वाहणारे मनमोहक झरे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
दरी ग्रामपंचायत व दऱ्याई माता देवस्थानतर्फे येथे पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या परिसराची पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण झाल्यामुळे वर्षभर या परिसरात पर्यटक भेटी देत असतात. (Dariyai Mata temple area attracts devotees Nashik Latest Marathi News)
हेही वाचा: भोजापूर धरण 100% भरले; बंधाऱ्याने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी
निसर्गरम्य परिसर, डोंगर-दऱ्यामधून वाहणारे झरे व सभोवतालची शेतीमुळे हिरवाईने नटलेल्या परिसरात मन प्रसन्न होते. स्थनिक नागरिक व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे पर्यटनस्थळाची मोठी जनजागृती झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर वनोपयोगी वृक्षलागवड करून त्याचे जतन केले जात असल्याने हा परिसर हिरवागाई झाला आहे. पर्यटक व भाविक मोठ्या प्रमाणात येत असले, तरी येथे अजूनही रस्ता खड्डेमय आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास या पर्यटनस्थळी राज्यभरातून पर्यटक येतील.
"दऱ्याई माता देवस्थान परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने आनंद आहे. येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोयी केल्या आहेत. पर्यटकांनीही येथे स्वच्छता ठेवावी व निसर्ग पर्यटनाचा आनंद घ्यावा." - भारत पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य, दरी
हेही वाचा: सराफ वाड्याची भिंत कोसळून 2 जण जखमी
Web Title: Dariyai Mata Temple Area Attracts Devotees Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..