Nashik Darna Dam : पाणीचोरांवर जिल्हाधिकाऱ्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; आवर्तनासाठी २२ तास वीजपुरवठा राहणार बंद!

Water Released From Darna Dam for Irrigation : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गोदावरीच्या उजव्या व डाव्या तट कालव्यांसाठी सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले असून पाणीचोरी टाळण्यासाठी कालव्यालगतच्या गावांमध्ये दररोज २२ तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Darna Dam

Darna Dam

sakal 

Updated on

नाशिक: दारणा धरणातून गोदावरी उजव्या व डाव्या तट कालव्यांमार्फत तसेच दारणा, गोदावरी नदीलगतच्या गावांना सिंचन व बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. ते ३१ मार्चपर्यंत चालेल. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कालव्यालगतच्या गावांमध्ये दररोज सकाळी सहा ते आठ हा दोन तासांचा कालावधी सोडून २२ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com