Nashik Dasara 2023: हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत रावणदहन! फटाक्यांची जोरदार आतषबाजी

Ravan Dahan Godaghat
Ravan Dahan Godaghatesakal

Nashik Dasara 2023 : चतुःसंप्रदाय आखाड्यातर्फे आयोजित रावणदहण सोहळा मंगळवारी (ता. २४) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. तत्पूर्वी रंगलेल्या राम-रावण सेनेच्या लुटुपुटीच्या लढाईचा आनंद उपस्थितांनी घेतला.

या वेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. चतुःसंप्रदाय आखाड्यातर्फे गत ६८ वर्षांपासून श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्यावतीने रावणदहन केले जाते. (dasara 2023 Ravana Dahan in presence of thousands of Nashikers Heavy fireworks display nashik)

मंगळवारी सायंकाळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे विधिवत पूजन करून दहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोठ्या उत्साहात व हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अनेकांनी हा सोहळा मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला. मोबाईलच्या लखलखाटाने परिसर उजाळून निघाला होता.

या वेळी बालाजी मंदिराचे प्रमुख महंत श्री कृष्णचरणदास महाराज, महंत फलाहारी महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज, महंत पितांबरदास महाराज, महंत माधवदास महाराज, महंत हरीओमदास महाराज,

पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, कपालेश्वर मंदिराचे विश्वस्त रावसाहेब कोशिरे यांच्यासह व्यंकटेश बालाजी मंदिराचे सागर कापसे, कपिल भोरे, कृष्णकुमार नेरकर, हितेशदास उदासी, घनश्याम गंधे, नंदू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Ravan Dahan Godaghat
Dasara 2023 : विजयादशमीला नागरिकांकडून ‘सोन्या’ची लूट; सुवर्णबाजारात कोटींची उलाढाल

सुरवातीला पंचवटी परिसरातून श्रीराम सेना, वानर सेना व रावण सेना यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. साडेसातच्या सुमारास ही मिरवणूक रामकुंडावर पोचल्यावर दोन्ही सेनेचे प्रतिकात्मक युद्ध होऊन, प्रभू श्रीराम विजय झाला.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचे पूजन करून रावणदहन करण्यात आले. या वेळी फटाक्यांची आकर्षक व नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.

हा सोहळा पाहण्यासाठी होळकर पूल, रामकुंड परिसर, गांधी तलाव, एकमुखी दत्तमंदिर आदी ठिकाणी हजारो नाशिककरांनी गर्दी केली होती. अनेकांना हा सोहळा मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही.

Ravan Dahan Godaghat
Dasara 2023 : धुळ्यात 75 कोटींची उलाढाल; सीमोल्लंघनासह वाहने, सोने खरेदीसाठी गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com