SNR26B22936
सिन्नर ः माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे पदाधिकारी दौलत मोगल यांना पुरस्कार देताना ॲड. नितीन ठाकरे, आमदार सत्यजित तांबे आदी.
-----------------
‘लोकशिक्षण’चे मोगल यांना
विशेष सेवा गौरव पुरस्कार
--------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.३ ः नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि जिल्हा कलाध्यापक संघातर्फे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलत मोगल यांना ‘विशेष सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार सत्यजित तांबे व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार देण्यात आला.
-------
शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतानाच मोगल यांनी माध्यमिक विद्यालयात ३५ वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी शिक्षक पतसंस्थेच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे तालुक्यातून स्वागत केले जात आहे. एस. जी. पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक विलास सातपुते, जल्हा शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय आदीक यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
---------------