दिंडोरी- दिंडोरीच्या पूर्व व पश्चिम भागात मार्चअखेरच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागल्याने अवघा दिंडोरी तालुका होरपळून निघाला आहे. दिंडोरी, वणी कसबे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात दिवसभर उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री डासांचा सामना करावा लागत आहे.