Diploma Admission: डिप्‍लोमाच्‍या द्वितीय वर्षाला प्रवेशासाठी 3 जुलैपर्यंत मुदत

Diploma admission
Diploma admission esakal

Diploma Admission : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविकेच्‍या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्‍यानुसार प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. (Deadline for admission to second year of Diploma 3rd July nashik news)

तंत्रनिकेतनमध्ये उपलब्‍ध असलेला पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला दहावीनंतर प्रवेश दिला जातो. यासोबत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेशाची संधी उपलब्‍ध केली जात असते.

त्‍यासाठी विद्यार्थ्याने भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, जीवशास्‍त्र, गणित, कॉम्‍प्‍युटर सायन्‍स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, बिझनेस स्‍टडीज, एन्‍ट्रासशिप यांपैकी कुठलेही तीन विषय घेऊन बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे आवश्‍यक आहे.

किंवा दहावीनंतर दोन वर्षे औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय) येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी पदविकेच्‍या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी पात्र आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Diploma admission
Ashish Shelar : सत्तेत असो वा नसो हिंदू जागरण करणारच : आशीष शेलार

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ३ जुलैपर्यंत संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे. याच कालावधीत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी या पर्यायांपैकी एकाची निवड करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

राखीव प्रवर्गाच्‍या जागांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्‍या ३१ मार्च २०२४ पर्यंत वैधता असलेले कागदपत्र सादर करायचे आहे. प्राप्त अर्जांतून ५ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

यादीबाबत तक्रार किंवा हरकती नोंदविण्यासाठी ६ ते ९ जुलै अशी मुदत दिली जाईल. यानंतर ११ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. व त्‍याआधारे प्रवेश फेरीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Diploma admission
Government Banks: कर्जवितरणाबाबत राष्ट्रीयकृत बँका उदासीन : नरेंद्र पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com