NSK26H31948
जळगाव : विद्यापीठात आयोजित चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत हेमंत मुंदडा, शिक्षिका निशात शेख आदी.
–––
कर्णबधीर विद्यार्थ्यांचे चित्रकला,
सांकेतिक वक्तृत्व स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : आवाज ऐकू येत नसला, शब्दांतून भावना व्यक्त करता येत नसल्या, तरी मनातील विचारांना आणि स्वप्नांना कोणतीही मर्यादा नसते, हे अपंग सेवा मंडळ संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून कलागुणांचा प्रेरणादायी परिचय करून दिला.
महात्मा गांधी यांच्या विचारांना चित्रांच्या रंगांतून आणि सांकेतिक भाषेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडत या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या कामगिरीमुळे केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण जळगावकरांचाही अभिमान उंचावला आहे. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांची सुंदर आणि आशयपूर्ण चित्रे रेखाटली. आपल्या कल्पनाशक्तीचा, कलागुणांचा आणि मेहनतीचा सुंदर आविष्कार त्यांनी कागदावर साकारला. स्पर्धेत प्रथम– हिरफा खान, द्वितीय– दिव्या पाटील, तर तृतीय– मोहिनी राजपूत यांनी पटकावला. विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका निशात शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
–––––––