Nashik News : स्कूल बसच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik News : स्कूल बसच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक रोड : पवारवाडी, जेलरोड परिसरात एका स्कूल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ वर्षाची शाळकरी बालिका ठार झाल्याचे दुर्दैवी घटना घडली. या प्रकारामुळे पवारवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Death of an eight year old girl in collision with school bus Nashik News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात स्कूल बसचालकाविरुद्ध करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव (रा. पवारवाडी, जेल रोड), असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.

अपेक्षा ही जेलरोड पेंढारकर कॉलनी येथे असलेल्या नवीन मराठी शाळेत शिकत होती. तिला स्कूल बस (एमएच- १५- जीव्ही- ३५४२) ही गाडी घरी सोडण्यासाठी आली असता, घरी सोडल्यानंतर गाडी चालकाने अचानक गाडी जोराने मागे घेतली.

त्यामुळे पाठीमागे असलेल्या अपेक्षाला बसची जोरदार धडक बसल्याने ती पाठीमागील चाकाखाली सापडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात प्रशिक विजय भालेराव यांनी बसचालक प्रवीण शेजवळ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

टॅग्स :Nashikdeathbus accident