
साल्हेर (जि. नाशिक) : बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील साल्हेर येथील आदिवासी शेतकरी सोन्या लहानु पवार यांच्या सर्जा- राजाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (ता. २५) उघडकीस आली. (Death of Bulls pair by snake bite on eve of bail pola Nashik Latest marathi news)
श्री. पवार यांनी बैलजोडी बुधवारी (ता. २४) रात्री आठला अंगणात बांधली होती. संध्याकाळी सोन्या पवार व त्याचे कुटुंब जेवण करून झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्री पवार उठले असता त्यांना सर्जा- राजा जमिनीवर कोसळलेले दिसून आले. समोरचे दृश्य पाहून पवार यांनी हंबरडा फोडला.
गुरूवारी सकाळी साल्हेर येथील मधुकर भोये, सकाळचे बातमीदार भास्कर बच्छाव यांना घटनेची माहिती मिळताच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी चंदन रुद्रवशी यांना माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी रुद्रवशी यांनी घटनेचा पंचनामा केला. बैलाचा मृत्यू सर्पदंशानेच झाल्याचा निष्कर्ष पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला. दरम्यान, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास भरपाई मिळत नसल्याचे सांगण्यात आल्याने पवार यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे.
कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करावी
साल्हेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना पूर्णपणे धुळ खात आहे. या भागात पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. संबंधित विभागाने तत्काळ या भागात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
"पोळा सणाच्या दिवशीच आदिवासी शेतकरी सोन्या पवार यांच्या बैल जोडीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून अशा घटनांना शेतकऱ्यांसाठी कुठलीच नुकसान भरपाई मिळत नाही. यापुढे शासनदरबारी अशा घटनांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करू." - दिलीप बोरसे, आमदार, बागलाण
"माझ्या जीवनात सर्जा- राजाची जोडी प्रथमच भेटली होती. सदर जोडी अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतली होती. अजून व्यापाऱ्याचे पैसे देणे बाकी आहे. त्यात बैलांचा मृत्यू झाल्यामुळे आमच्यावर मोठे संकट कोसळले आहे." - सोन्या पवार, आदिवासी शेतकरी, साल्हेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.