एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा पीककर्जाचा मार्ग मोकळा...कारण...

farmers-generic.jpg
farmers-generic.jpg
Updated on

नाशिक : राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत खाते प्रमाणीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक खाते प्रमाणीकरण झाल्याने या शेतकऱ्यांचा पीककर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीक विचारात घेऊन वाढीव कर्ज देण्यास सुरवात केली आहे.

एक लाख 24 हजार 105 खात्यांना मान्यता

बॅंक ऑफ महाराष्ट्र या लीड बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती बुधवारी (ता. 24) सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. कर्जमुक्ती योजनेंतर्गत एक लाख 31 हजार 413 खाती अपलोड करण्यात आली होती. त्यातील एक लाख 24 हजार 105 खात्यांना मान्यता मिळाली. ही खाती पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लाख पाच हजार 846 खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे असे सांगत जिल्हा उपनिबंध गौतम बलसाने म्हणाले, की कर्जमुक्तीची खाते गावात प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यावरील नाव, गाव, थकबाकी अशी सर्व माहिती मान्य असल्यावर शेतकऱ्यांना "ओके' म्हणून "थम्ब' दिला, की थकीत रक्कम जमा होईल. 

20 टक्के पीककर्जाचे वाटप 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपासाठी तीन हजार 303 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यापैकी 473 कोटी म्हणजेच, 20 टक्के पीककर्जाचे वाटप आतापर्यंत झाले आहे. त्यात जिल्हा बॅंकेच्या 64 कोटींचा समावेश आहे. 

 "त्या' 42 शाखा बंदच राहणार! 

जिल्हा बॅंकेतर्फे तोट्यातील 42 शाखा बंद करण्यात आल्या आहेत. या शाखा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. बॅंकेच्या 26 जूनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीने विषय मांडला जाण्याची शक्‍यता असल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र बॅंकेच्या प्रशासनातर्फे त्यासंबंधीचा कसल्याही प्रकारचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार शाखा बंद करण्यात आलेल्या असल्याने त्या सुरू करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असेही सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com