esakal | शाळा-महाविद्यालयांबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांच्‍या कोर्टात; पालकांचे निर्णयाकडे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

शाळा-महाविद्यालयांबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांच्‍या कोर्टात

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. राज्‍यस्‍तरावरील सर्वेक्षणातून ही प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्‍याअनुषंगाने शिक्षण विभागाकडून पुढील प्रक्रिया राबविली जात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय आपत्ती व्‍यवस्‍थापन समितीवर अवलंबून असेल. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्‍या उपस्‍थितीत बैठक होत असल्‍याने, या वेळी काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागून राहील. (decision-regarding-schools-colleges-will-taken-by-Guardian-Minister-jpd93)

विद्यार्थी-पालक अनुकूल; आपत्ती व्‍यवस्‍थापन बैठकीकडे लक्ष

कोरोनाविषयक आढावा बैठक दर आठवड्याला घेतली जाते. येत्‍या दोन दिवसांत बैठक होण्याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, यापूर्वी शिक्षण विभागाने जाहीर केलेल्‍या भूमिकेनुसार गुरुवार (ता. १५)पासून शाळा सुरू होण्याची शक्‍यता तूर्त मावळली आहे. पूर्वीप्रमाणे ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू राहील. शासनाच्‍या धोरणानुसार ग्रामीण भागातील कोरोनामुक्‍त गावांमध्ये ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्‍या संमतीने शाळा सुरू करण्याचे सुचविले आहे. याअनुषंगाने जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागातर्फे माहिती संकलन प्रक्रिया अंतिम टप्प्‍यात आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात स्‍थानिक आपत्ती व्‍यवस्‍थापन समितीची परवानगी महत्त्वाची आहे. त्‍यामुळे आगामी बैठकीत शाळांसंदर्भात काय निर्णय घेतला जातो, याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

loading image