नाशिकमधील 350 खाटांचे ठक्कर डोम कोवीड सेंटर होणार बंद; महापालिकेचा निर्णय

thakkar dome covid center
thakkar dome covid centeresakal

नाशिक : महापालिकेने क्रेडाई (CREDAI) संस्थेच्या सहकार्याने उभारलेले ठक्कर डोम कोविड सेंटर (thakkar dome covid center) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा (corona virus) वेग वाढत असताना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून क्रेडाई संस्थेने साडेतीनशे खाटांचे ठक्कर डोम येथे कोविड सेंटर उभारले होते. (Decision to close Thakkar Dom covid Center)

या कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मात्र रुग्णसंख्येचा वेग सहा ते सात पटीने वाढल्याने शहरांमध्ये बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे महापालिकेने ठक्कर डोम कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यात आली. मार्च ते एप्रिल महिन्याच्या कालावधीमध्ये झपाट्याने वाढणारे रुग्णसंख्या, मे महिन्यात मात्र कमी होऊ लागली. रुग्णसंख्या कमी होत असल्याने रिक्त बेडची संख्या ५० टक्क्यांवर घसरली.

thakkar dome covid center
इथे मृत्यूदर वाढतोय; शहरातील नऊ रुग्णालयांना नोटिसा

तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर बंद

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालय, समाजकल्याण, मेरी या चार सेंटरमध्ये एक हजार २२५ पैकी ९७० बेड सध्या रिक्त आहे. त्यामुळे ठक्कर डोम ३२५ खाटांचे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात ठक्कर डोम कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, याऐवजी संभाजी स्टेडिअम, मेरी, मीनाताई ठाकरे कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा वेग आता आटोक्यात येत असून, रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

thakkar dome covid center
रेमडेसिव्हिरनंतर आता 'ॲम्फोटेरिसिन' साठी धावपळ

मनुष्यबळ तपासणार

कोरोना तिसऱ्या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिकेकडे सध्या कार्यरत असलेले व रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com