Nashik : तारांगण, विज्ञान केंद्र सुरू करण्याचा निर्णय

Yashwantrao Chavan planetarium latest news
Yashwantrao Chavan planetarium latest newsesakal

नाशिक : महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नियमानुसार पार पडलेल्या महासभा व स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी देताना यशवंतराव चव्हाण तारांगण व विज्ञान केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. १४ मार्चला महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक योजनेची मुदत संपुष्टात आली.

ओबीसी आरक्षण व न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका लांबल्या. आता तर न्यायालयाने पुढील पाच आठवडे निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया आणखीन लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी महासभा व स्थायी समितीच्या परंपरेला साजेसे निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतले. (Decision to start planetarium science center in mahasabha sthayi samiti meeting nashik latest marathi news)

पूर्वी नगरसचिवांच्या माध्यमातून आयुक्त तथा प्रशासकासमोर विषय मंजुरीला ठेवले जात होते. परंतु, डॉ. पुलकुंडवार यांनी स्थायी व महासभेनुसारच कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयुक्तांच्या दालनात गुरुवारी (ता.२५) महासभा व स्थायी समिती बैठक आयोजित करण्यात आली होती.

यात त्र्यंबक रोडवरील यशवंतराव चव्हाण तारांगण व विज्ञान केंद्र चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हीजन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला चार लाख ८५ हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आला. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभाग २३ मधील सिद्धार्थनगर हिरेनगर, टागोरनगर, डीजीपीनगर क्रमांक एक, गणेशबाबानगर, बजरंगवाडी येथे मलनिस्सारण व्यवस्थेअंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्याचा कामाला मंजुरी देण्यात आली.

त्याचप्रमाणे सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ व २४ मधील जुन्या मलवाहिका बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक सहामधील मोरे मळा व हनुमानवाडी येथील नवीन जलकुंभासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी चार कोटी ६८ लाख ९८ हजार रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली.

Yashwantrao Chavan planetarium latest news
Russia- Ukrainमधील संघर्षामुळे भारतातून गहू पिठाच्या निर्यातीत 200 टक्के वाढ

प्रभाग क्रमांक १५ मधील पखाल रोड येथे द्वारका जलकुंभापर्यंत पाचशे मिलिमीटर व्यासाच्या गुरुत्ववाहिनी टाकण्याच्या जवळपास तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २१ च्या जाचकनगर व वास्तुपात परिसरात नवीन पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरक्षारक्षकांना मुदतवाढ

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालय व महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांना दहा महिन्याची मुदतवाढ देताना एक कोटी २८ लाख ६५ हजार रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली.

Yashwantrao Chavan planetarium latest news
लाचखोरीच्या कारवाईने ‘आरोग्या’तील Corruption चव्हाट्यावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com