esakal | येवल्यात लाल कांदा आवकेत घट; बाजारभावात मात्र वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

onion sakal 123.jpg

सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल उपबाजार आवारात लाल कांदा आवकेत घट होताना बाजारभावात मात्र वाढ झाली आहे

येवल्यात लाल कांदा आवकेत घट; बाजारभावात मात्र वाढ

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल उपबाजार आवारात लाल कांदा आवकेत घट होताना बाजारभावात मात्र वाढ झाली आहे. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश व परदेशात चांगली मागणी होती.

येवल्यात लाल कांदा आवकेत घट 

सप्ताहात कांदा आवक ३० हजार ५१० क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान ७०० ते कमाल तीन हजार ७७६, तर सरासरी तीन हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक २२ हजार ५६९ क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान ७०० ते कमाल चार हजार तर सरासरी तीन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

बाजारभाव चार हजारांपर्यंत 
गव्हाच्या आवकेत वाढ झाली, तर बाजारभाव स्थिर होते. गव्हाची आवक ७७६ क्विंटल झाली. बाजारभाव किमान एक हजार ४०० ते कमाल एक हजार ७२६ तर सरासरी एक हजार ६०० रुपयांपर्यंत होते. बाजरीची आवक ५१७ क्विंटल झाली. बाजारभाव किमान एक हजार ते कमाल एक हजार ७०१, तर सरासरी एक हजार १५० रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची आवक ४४ क्विंटल झाली. बाजारभाव तीन ते चार हजार ३७५, तर सरासरी तीन हजार ८५० रुपयांपर्यंत होते. तुरीची आवक ८० क्विंटल झाली. बाजारभाव किमान चार हजार ५०० ते कमाल सात हजार एक, तर सरासरी पाच हजार ९०० रुपयांपर्यंत होते. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार
सोयाबीनची आवक २६ क्विंटल झाली. बाजारभाव किमान तीन हजार ५०० ते कमाल चार हजार ६८२, तर सरासरी चार हजार ४०० रुपयांपर्यंत होते. मका आवक ३० हजार ६९२ क्विंटल झाली. बाजारभाव एक हजार १०० ते एक हजार ४१९, तर सरासरी एक हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. अंदरसूल उपबाजारात मका आवक चार हजार ९५५ क्विंटल झाली. बाजारभाव किमान एक हजार १५० ते एक हजार ४१६, तर सरासरी एक हजार ३४० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.  

loading image