कळवण- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नांदुरी- नाशिक रस्त्याचे चौपदरीकरण व नांदुरी-दळवट- हतगड या गुजरातला जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याच्या कामाचा ‘अर्थसंकल्प २०२५’मध्ये समावेश करण्यात येऊन निधीची तरतूद करण्यात आली. कळवणचे आमदार नितीन पवार यांनी ही माहिती दिली.