खोपडे यांचा पदग्रहण सोहळा

खोपडे यांचा पदग्रहण सोहळा
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- खोपडे यांचा पदग्रहण सोहळा - धुळे महापालिका : शिवसेनेचे नेते गुरूवारी येणार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक खोपडे यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या नव्या इमारतीत गुरुवारी (ता. २९) सकाळी दहाला हा सोहळा होईल. शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेत्या शुभांगी पाटील, सरिता माळी (कोल्हे), आमदार मंजुळा गावित, माजी आमदार फारुक शाह, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, सुहास कांदे, अनुप अग्रवाल आणि राम भदाणे उपस्थित असतील. महापौर मायादेवी परदेशी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी, माजी महापौर भगवान करनकाळ आणि हिलाल माळी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सतीश महाले, मनोज मोरे, संजय वाल्हे, महिला जिल्हाध्यक्षा हेमा हेमाडे आणि शहर विकास आघाडीचे गटनेते शाहबाज शाह यांच्यासह शिवसेना, युवासेना, शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com