Deepika Chavan targets government over NCMC card rule
esakal
सटाणा : एकीकडे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवत असले तरी दुसरीकडे राज्यातील भाजपा महायुती सरकारकडून मात्र महिलांना दिलेल्या सवलती काढून घेण्यासाठी नवनवीन अटी लादल्या जात आहेत. निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ म्हणत मते मागायची आणि सत्तेवर आल्यानंतर त्याच बहिणींना योजनांच्या लाभातून बाहेरचा रस्ता दाखवायचा, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे, असा घणाघाती हल्ला महायुती सरकारवर चढवत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी महिला भगिनींना कोणत्याही अडथळ्याविना एसटी बसचा प्रवास मिळावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.