Nashik Crime News : मालेगावी हरणाचे मांस जप्त; एका संशयिताला अटक

Police arresting Sharjeel Anjum Ahmed, a suspect who was carrying deer meat.
Police arresting Sharjeel Anjum Ahmed, a suspect who was carrying deer meat.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील गुलशनाबाद भागात सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्यासह विशेष पथक, आझादनगर पोलिस व वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून हरणाचे पंधरा किलो मांस, सुरा, चाकू जप्त केले.

या प्रकरणी वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन व संरक्षित प्राण्याची शिकार केल्याच्या संशयावरुन शरजील अंजुम अहमद (वय ३०, रा. मेन रोड, गुलशनाबाद) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (ता.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. (Deer Meat Seized Suspect Arrested at malegaon Nashik Crime News)

मालेगाव : सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू व त्यांचे पथक हरणाचे मांस व अन्य साहित्य जप्त करताना.
मालेगाव : सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू व त्यांचे पथक हरणाचे मांस व अन्य साहित्य जप्त करताना. esakal

शहरात अवैध शिकार करुन हरणाचे मांस आणल्याची माहिती श्री. संधू यांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच श्री. संधू, आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावीद खाटिक, वन परिमंडळ अधिकारी अतुल देवरे, सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक, आझादनगर पाेलिस आदिंनी संयुक्तरित्या शरजील अंजुम यांच्या घराजवळ छापा टाकला असता हरणाचे मांस मिळून आले.

डाॅ. खाटिक यांनी घटनास्थळी मांस जप्त केल्यानंतर मांस व अन्य वस्तुंची तपासणी केली. यावेळी हरणाचे मुंडके, कान व कातडीसह तसेच चारही पाय व खुरे मिळून आले. त्यावरुन चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करुन हे मांस आणल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे डॉ. खाटिक यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Police arresting Sharjeel Anjum Ahmed, a suspect who was carrying deer meat.
Nashik Crime News : शहरात अवैधरित्या मद्यविक्री; तिघांना अटक

पोलिस हरणाची शिकार कोठे केली? मांस कोठून आणले? मांस आणण्याचे प्रयोजन काय? संशयितानेच शिकार केली की अन्य कोणी? याबाबत चौकशी करीत आहेत.

शहरात आगामी काळात वन्य प्राण्यांची शिकार करुन मांस आणणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री. संधू यांनी दिला आहे. रात्री उशिरा शरजील अंजुम विरुध्द आझादनगर पाेलिस ठाण्यात वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Police arresting Sharjeel Anjum Ahmed, a suspect who was carrying deer meat.
Nashik News : अवैध देशी दारू गुत्त्यांवर पोलिसांची छापेमारी; 90 हजारांचा मद्यसाठा जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com