Nashik: भद्रकाली पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीलाच भगदाड; संबंधितांच्या दुर्लक्षामुळे चोरट्यांसाठी आयती संधी

Bhadrakali police station protection wall debris and garbage lying there
Bhadrakali police station protection wall debris and garbage lying thereesakal

Nashik : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या मागील संरक्षण भिंतीस मोठे भगदाड पडले आहे. जणू पोलिसांनीच चोरट्यांसाठी उपलब्ध करून दिलेली संधी किंवा परिसरातील रहिवाशांना केरकचरा टाकण्याची जणू जागा उपलब्ध झाली असल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झाले आहे.

त्यातच, पोलीस ठाण्याच्या आवारातील मुद्देमालाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले असून, आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. (Defense wall of Bhadrakali police station breached Due to negligence of concerned an opportunity for thieves nashik news)

गुन्ह्यांतील, चोरी, बेवारस मिळून आलेल्या दुचाकी या आवारात लावण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध गुन्ह्यातील मुद्देमालही तेथे पडून आहे. पोलीस ठाणे आवारातूनच यांची चोरी होऊ नये, यासाठी पोलीस ठाण्यास संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे.

मात्र, या संरक्षण भिंतीलाच मोठे भगदाड पडले आहे. विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून हे भगदाड असूनही पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आवारात पडून असलेल्या संपूर्ण मुद्देमालाची सुरक्षा त्यामुळे रामभरोसे झाली आहे.

हा मुद्देमाल संबंधीत कारकूनाच्या ताब्यात असतो. वेळोवेळी त्यांच्याकडून त्याची तपासणी होणे गरजेचे असते. त्यांच्याकडून जर तपासणी होत असती, तसेच भगदाड परिसरात वर्षानुवर्षे पडून असलेल्या दुचाकींची तपासणी केली असती, तर हे भगदाड निश्‍चितच दिसून आले असते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून भगदाड बुजविण्याची कारवाई झाली असती. परंतु, भगदाड तसेच असल्याने मुद्देमाल कारकूनांचेदेखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, चोरट्यांना मात्र यामुळे चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बऱ्याच वर्षापासून पडून असलेल्या दुचाकींच्या बॅटरीसह विविध सुटे भाग चोरीस गेल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत या दुचाकींचा लिलाव होणार आहे.

त्यासाठी मुद्देमाल कारकूनकडून त्या सर्व दुचाकींची तपासणी करून यादी तयार केली असण्याचीही शक्यता आहे. मात्र, यादी तयार करत असतानादेखील एवढे मोठे भगदाड त्यांना आढळले नाही, हे विशेष आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bhadrakali police station protection wall debris and garbage lying there
Sewage Survey : ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे 30 टक्के सर्वेक्षण पुर्ण; आयुक्त पुलकुंडवार

कदाचित त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, भविष्यात हेच दुर्लक्ष अडचणीचे ठरणार आहे. मोठ्या प्रमाणावर चोरीची घटना किंवा अन्य कुठलीही घटना होण्याची शक्यता यामुळे नाकारता येत नाही.

काही विषारी प्राणीही या भगदाडच्या माध्यमातून रहिवासी परिसरात, तसेच पोलीस ठाणे आवारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष देत भगदाड बंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

कचराकुंडीचे स्वरूप

पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीस पडलेल्या भगदाडामुळे केवळ पोलीस ठाणे आवरातील मुद्देमालाची सुरक्षाच रामभरोसे झाली नसून, एकुणच या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भिंतीस लागून असलेल्या रहिवासी भागातील नागरिकांकडून केरकचरा, शिळे अन्न, अन्य विविध टाकाऊ वस्तु आणून या ठिकाणी टाकले जातात. त्याकडेही लक्ष देण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Bhadrakali police station protection wall debris and garbage lying there
Police Transfer : राज्यात 8 कार्यालय अधीक्षकांच्या बदल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com