Nashik Monsoon Update : नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस; १९.३ मिमीचंच पर्जन्य रेकॉर्ड
Delayed Monsoon in Nashik, Rising Temperatures Affecting Residents : नाशिक जिल्ह्यात उष्णतेत वाढ आणि विलंबित मॉन्सूनचा परिणाम, मात्र मृग नक्षत्राच्या धाऱ्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाच्या चांगल्या संधीचे संकेत मिळत आहेत.
नाशिक- जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः १० जूनला दाखल होणारा मॉन्सून यंदा कोकण व मुंबई परिसरातच रेंगाळला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यात तापमान वाढले असून, नागरिक अक्षरशः घामाघूम झाले आहेत. चालू जून महिन्यात आतापर्यंत केवळ १९.३ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे.