Nashik News: नाशिकच्या 2 डॉक्टरांची दिल्ली- काठमांडू सायकल राइड; देशातील पहिलीच क्रॉसकंट्री Cycle Ride | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Mustafa Topiwala and Dr. Rahul Patil

Nashik News: नाशिकच्या 2 डॉक्टरांची दिल्ली- काठमांडू सायकल राइड; देशातील पहिलीच क्रॉसकंट्री Cycle Ride

नाशिक : धार्मिक- यांत्रिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक क्रीडा क्षेत्रातही एक पाऊल टाकले आहे. अलीकडे तर सायकलिस्ट यांनीही नावलौकिकात भर टाकली असून, सोमवारी (ता.२०) पुन्हा नाशिकचे दोन डॉक्टर दिल्लीतून काठमांडूपर्यंत (नेपाळ) १२०० किलोमीटरचे अंतर चार दिवसात सायकलीवरून पार करणार आहेत.

विशेषत: देशातील ही पहिलीच क्रॉसकंट्री सायकल राइड आहे. देशभरातील १२ सायकलिस्ट हा विक्रम नोंदविणार असून, यात नाशिकचे डॉ. मुस्तफा टोपीवाला व डॉ. राहुल पाटील यांचा सहभाग आहे. (Delh to Kathmandu cycle ride of 2 Nashik doctors Countries First Cross Country Cycle Ride Nashik New)

नाशिकचे नामांकित फिजिओथेरपिस्ट डॉ. मुस्तफा टोपीवाला आणि डेंन्टिस्ट डॉ. राहुल पाटील यांच्यासह देशभरातील १२ सायकलिस्ट सोमवारी (ता. २०) दिल्ली येथून पहाटे ५ वाजता काठमांडूच्या (नेपाळ) दिशेने सायकलीवरून निघणार आहेत.

भारतातून परदेशात अशारीतीने पहिल्यांदाच सायकलींग करीत सायकलपटू जात आहेत. सुमारे १२०० किलोमीटर अंतरासाठी या १२ सायकलिस्टला चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान, सितारगंज, चिसापानी, लॅम्हाई, लुंबिनी, चिम्लीग्टर या शहरातून काठमांडूत सायकलिस्ट दाखल होतील.

दिल्लीकडून काठमांडूकडे जाताना मार्ग अत्यंत खडतर असून, पूर्ण चढ आणि डोंगरातून या सायकलपटूंना मार्गक्रमण करावे लागणार आहे. त्यामुळे अशारीतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रॉसकंट्री सायकलींग सहभागींसाठी अत्यंत खडतर असणार आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दिल्ली-काठमांडू अशी पहिलीच क्रॉसकंट्री सायकलिंग होत असताना, त्याची नोंद घेतली जाणार आहेच. याशिवाय, एक महत्त्वाचा उद्देश ठेवून ही क्रॉसकंट्री सायकलिंगचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सायकलपटू काठमांडू येथे पोचल्यानंतर गरीब वस्तीमध्ये जाऊन गोरगरिबांना धान्य वाटप करणार आहेत. यावेळी नेपाळमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी-कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील १२ सायकलिस्ट सहभागी

दिल्ली-काठमांडू क्रॉसकंट्री सायकलिंगमध्ये देशभरातून १२ सायकलिस्ट सहभागी झालेले आहेत. यात नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिजिओथेरपिस्ट डॉ. मुस्तफा टोपीवाला व डॉ. राहुल पाटील यांच्यासह दिल्ली, पंजाब आणि गुजरातमधील सायकलिस्ट सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :NashikdoctorCycle Ride