Delhi-Nashik हवाईसेवा 4 ऑगस्टपासून | Latest Marath News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air Service from Ozar Airport latest marathi news

Delhi-Nashik हवाईसेवा 4 ऑगस्टपासून

नाशिक : स्पाइस जेट कंपनीकडून ४ ऑगस्टपासून दिल्ली- नाशिक हवाईसेवेला प्रारंभ होणार आहे. २९ सप्टेंबरपर्यंत विंटर सीझनचे वेळापत्रक कंपनीकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर समर सीझनचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. (Delhi Nashik Air Service starts from 4th August nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Ankai Fort : आवडते पर्यटनस्थळ; स्वप्नवत सौंदर्यामुळे पर्यटकांचा ओढा

४ ते ९ ऑगस्ट या कालावधीसाठी दिल्लीहून सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. त्यानंतर सकाळी ९. ४५ वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. ओझर विमानतळावरून १०. १५ मिनिटांनी उड्डाण होईल. दुपारी १२.१५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोचेल.

१० ऑगस्टपासून २९ सप्टेंबरपर्यंत नवीन वेळापत्रकानुसार सेवा सुरू राहील. सकाळी ६. ३५ मिनिटांनी दिल्लीहून विमानाचे उड्डाण होईल. सकाळी ८.३० मिनिटांनी ओझर विमानतळावर आगमन होईल. ओझरहून दिल्लीसाठी ९ वाजता उड्डाण होईल. १०. ४५ मिनिटांनी पोहचेल. त्यानंतर दिल्ली, नाशिक विमानसेवेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

हेही वाचा: Nashik : शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी कमिटी

Web Title: Delhi Nashik Air Service Starts From 4th August Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..