फोटो ओळी 11145
नांदगाव ः तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देताना नीलेश चव्हाण आदी.
कृषी साहित्य चोरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) तहसीलदारांना निवेदन
नांदगाव, ता. ८ ः तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात असताना कृषिपंप, केबल, स्टार्टर व अन्य कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या घटनांना पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी केली.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ आणि पोलिसांची उदासीनता यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यास संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना मर्यादा येतात आणि शेतकऱ्यांना मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी अडचणी आणि पोलिस ठाण्याच्या चकरा वाढतात, मुद्देमाल सुपूर्द करतांना जुन्या खरेदी पावतीचा आग्रह न धरता इतर परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशीही मागणी करण्यात आली. शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
..........