Summer Business : उन्हाच्या चटक्याने लोखंडी कुलर वाढली मागणी; दरात 20 टक्के वाढ

Iron coolers for sale in a shop near the new bus stand in Malegaon...
Iron coolers for sale in a shop near the new bus stand in Malegaon...esakal

Summer Business : शहर व परिसरात तापमानाने चाळिशी ओलांडल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांचा जीवाची काहिली होत आहे. तर गेल्या दोन आठवड्यापासून तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

या कडक उन्हाळ्यापासून बचाव व्हावा यासाठी येथील नागरिकांना मालेगाव शहरात तयार होणाऱ्या स्वस्त अशा लोखंडी कुलरला अधिक मागणी होत आहे. शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही मालेगावच्या लोखंडी कुलरला मागणी वाढली आहे.

पंधरा दिवसात शहरातून हजारो कूलरची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीचा तुलनेत यंदा कुलरच्या किमती वीस टक्क्यांनी वाढल्या आहे. (Demand for Iron Cooler increased due to hot summer 20 percent increase in rates nashik news)

शहरात मोठ्या संख्येने फळी-पत्र्यांचे घरे आहेत. नागरिकांना राहण्यासाठी जरी घरे असली तरी त्या घराची सरासरीपेक्षा उंची नियमित घरांपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या घरात राहताना अक्षरक्षा: अंगाची लाहीलाही होते.

त्यामुळे यातून सुटका होण्यासाठी लोकल मेड कुलर खरेदी करण्यावर भर असतो. शहरात २०१६ पासून लोखंडी कुलर तयार केले जाते. अडीच फुटापासून ते साडेतीन फुटापर्यत कुलर बनविला जातो. हे कुलर १ हजार सहाशे पासून ते सहा हजारापर्यंत आकारानुसार विकले जातात.

जळगाव, नागपूर, धुळे या जिल्ह्यातून कुलरचे सुटे भाग आणून कारागीर पूर्ण कुलर तयार करतात. येथे कुलर तयार करणारे तीन मोठे कारखाने आहे. या कारखान्यात दिवसाला तीनशे कुलर तयार केले जात असून या कुलरमध्ये दोन प्रकार आहेत.

स्टील व लोखंडी. यात मोठ्या प्रमाणात लोखंडी बॉडी असलेल्या तीन फूट कुलरला सर्वात जास्त मागणी आहे. येथे सुमारे १५० कुलर विक्रीची दुकाने आहेत. उन्हाळ्याचा सीझनमध्ये येथून सुमारे पन्नास हजार कुलरची विक्री होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Iron coolers for sale in a shop near the new bus stand in Malegaon...
Summer Onion Storage : रखरखीत उन्हात कांद्याची साठवणूक; सिन्नरच्या पूर्व, पश्‍चिम भागातील चित्र

शहारापाठोपाठ नाशिक, नगर, कल्याण, भिवंडी, मुंबई, सुरत येथे व्यापारी कुलर विक्रीस पाठवितात. येथे जळगाव व नागपूर येथील कुलर विक्रीसाठी येत होते. मालेगावात तयार होणाऱ्या कुलरमुळे खान्देश व विदर्भातील कुलर विक्रीसाठी बंद झाला आहे. लोखंडी कुलरमुळे येथे इतर प्रकारच्या कुलरची मागणी घटली.

कुलरचे सध्याचे दर (हजारात)

दोन फूट - १ हजार ४५० ते १ हजार ८५०

अडीच फूट - १ हजार ८५० ते २ हजार ६००

तीन फूट - ३००० ते ३ हजार ४५०

साडेतीन फूट - ३ हजार ५०० ते ४०००

"या वर्षी अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे कुलरला मागणी कमी होती. पंधरा दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने कुलरच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली."

- इम्रान शेख, कुलर बनविणारे कारागीर, मालेगाव.

"एप्रिल महिन्यापासून कुलर विक्रीसाठी आणले होते. उन्हाचा चटका वाढल्याने आता कुलरची विक्री वाढली आहे. मार्च ते मे महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत कारागिरांची मजुरीही सुटली नव्हती." - तौसिफ सलाउद्दीन मन्सुरी, कुलर निर्माते मालेगाव

Iron coolers for sale in a shop near the new bus stand in Malegaon...
Dr. Bharati Pawar : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचा बैठकीतूनच जिल्हाधिकाऱ्यांना फोन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com