Ramzan : बाशी तिवासीला स्थानिक पर्यटनाला जोर; यंत्रमागाचा खडखडाट बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramzan Eid

Ramzan : बाशी तिवासीला स्थानिक पर्यटनाला जोर; यंत्रमागाचा खडखडाट बंद

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात रमजान ईद (Ramzan Eid) मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी झाल्यानंतर बाशी तिवासी ईदला स्थानिक व नजीकच्या पर्यटनस्थळांना कुटुंबियांसह भेटी देण्यावर मुस्लीम बांधवांचा जोर होता. सणामुळे चॉंदरातपासून यंत्रमागाचा खडखडाट गेली पाच दिवस बंद आहे. बुधवारी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत घरोघरी शिरखुर्म्याची मेजवाणी दिली. दुपारनंतर शहरातील चित्रपटगृह, खाद्यपदार्थ स्टॉल्स व हॉटेल्स हाऊसफुल झाल्या होत्या. सणामुळे यात मोठी उलाढाल झाली. चित्रपटगृही फुल होते. (demand for local tourism on Ramzan Bashi Tiwasi Nashik Ramzan News)

शहर व परिसरात सूर्यनारायणाचा प्रकोप सुरुच असल्याने पर्यटनाला काही प्रमाणात चाप बसला असला तरी बाशी ईदला बहुसंख्य मुस्लीम बांधवांनी कुटुंबियांसह नजीकच्या शेत शिवारात व चाळीसगाव फाटा परिसरातील फार्म हाऊसमध्ये बगीचा करण्याला प्राधान्य दिले. त्या बरोबरच अनेक जण औरंगाबाद, सापुतारा, चाळीसगाव या परिसरासह शहराजवळील गिरणा डॅम, गाळणे, करंजगव्हाण, पाटणे दर्गा व परिसरात रिक्षा व विविध वाहनातून पर्यटनासाठी गेले. बाशी व तिवासी ईदला मौज मजा करण्यावरच अनेकांचा भर होता. उद्या (ता. ६) जुम्मा शुक्रवारची साप्ताहिक सुटी असल्याने काही यंत्रमाग शनिवारपासून तर बहुसंख्य यंत्रमाग सोमवारपासून सुरु होतील. गेली पाच दिवस यंत्रमागाचा खडखडाट बंद असल्याने शहरात शांततेचे वातावरण आहे. सणाचा फिवर अद्यापही कायम आहे. नजीकच्या स्थळी पर्यटनामुळे रिक्षा व्यावसायिकांचाही जोरदार व्यवसाय झाला.

हेही वाचा: BCCI महिला T-20 क्रिकेट स्पर्धेत माया चमकली; महाराष्ट्राला उपविजेतेपद

शहराबरोबरच ग्रामीण भागातही अक्षयतृतीया (Akshay Tritiya) व ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांमुळे उत्साहाचे वातावरण आहे. यात्रांसाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले अनेक नोकरदार गावाकडे आले आहेत. यात्रा व सणाची संधी साधून नोकरदार नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामीण भागात प्रामुख्याने सध्या कांदा काढणीचे काम सुरु आहे.

हेही वाचा: लाच घेताना पोलीस हवालदार जाळयात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Web Title: Demand For Local Tourism On Ramzan Bashi Tiwasi Nashik Ramzan News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top