मालेगावी प्लॅस्टिक कागदाला मागणी; महिनाभरात लाखो रुपयांची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic paper

मालेगावी प्लॅस्टिक कागदाला मागणी; महिनाभरात लाखो रुपयांची उलाढाल

मालेगाव (जि. नाशिक) : पावसाने दमदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांची प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी लगबग सुरु आहे. शहरात किदवाई रस्त्यावरील हातगाडी व दुकानांवर प्लॅस्टिक, बॅनर विकले जात आहेत. यात प्रामुख्याने शेतकरी कांदाचाळ, ताडपत्री, ग्रीन नेट आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. प्लॅस्टिक व्यवसायातून येथे महिनाभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

प्लॅस्टिक कागदासाठी मालेगाव प्रसिद्ध आहे. कांदाचाळी, शेतमाल व मातीची घरे झाकण्यासाठी पावसाळ्यात प्लॅस्टिक कागद वापरला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांचा कल किदवाई रस्त्यावरील प्लॅस्टिक कागद खरेदीकडे दरवर्षी असतो. यावर्षी येथे मेच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच प्लॅस्टिक कागद खरेदीला सुरवात झाली. महिनाभरात तीन ते चार टन प्लॅस्टिक कागद विकला गेला. यात प्रामुख्याने पोल्ट्री फॉर्म, कांदाचाळ, मातीच्या घरावर, मका, बाजरीचा पावसापासून बचाव होण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक प्लॅस्टिक कागद खरेदी करीत आहेत. प्लॅस्टिक पाठोपाठ स्थानिक तसेच मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरातील मोठे बॅनर येथील विक्रीसाठी आणले जातात. किदवाई रस्त्यावर छोट्या- मोठ्या आकाराचे बॅनर्स विकले जातात. प्लॅस्टिक व बॅनरच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत दहा ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. प्लॅस्टिकच्या किमती वाढल्याने गेल्या वर्षातील प्लॅस्टिक विक्रीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. प्लॅस्टिकचा माल अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणावर येतो. प्लॅस्टिकमध्ये १२ फूटच्या प्लॅस्टिकला सर्वाधिक मागणी आहे.

हेही वाचा: किसान सन्मान योजनेतील गमतीजमतीमुळे शेतकरी त्रस्त

येथील प्लॅस्टिक कागद व बॅनर खरेदीला सटाणा, नांदगाव, करंजगव्हाण, झोडगे, सौंदाणे, वडनेर, नामपूर परिसरातील शेतकरी येत आहेत. प्लॅस्टिक कागद विक्रीची येथे ३० ते ४० दुकाने आहेत. प्लॅस्टिक कागदाबरोबरच येथे बॅनरलाही चांगली मागणी आहे. बॅनरचा नवीन-जुना माल राजस्थान, मुंबई, पुणे या ठिकाणांहून येतो. यात सर्वात जास्त मोठी साईज २० बाय ४० ला मागणी आहे. नवीन जाड कागदापेक्षा बॅनर हे शेतकऱ्यांना परवडते. बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल बॅनर घेण्याकडे आहे. बॅनरचा उपयोग शहरात गळत असलेल्या पत्रा व मातीच्या घरांसाठीही केला जात आहे. याठिकाणी प्लॅस्टिक विक्रीचा ३० दुकाने तर बॅनर विक्रीच्या वीसपेक्षा अधिक दुकाने आहेत. एका दुकानात तीन ते चार मजूर काम करतात. यात २०० ते २५० नागरिकांना रोजगार मिळत आहे.

हेही वाचा: Nashik : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर नाशिकची छाप


''प्लॅस्टिक व बॅनरच्या किंमती वाढल्याने शेतकरी कागद कमी प्रमाणात खरेदी करीत आहेत. महागाईचा फटका या व्यवसायालाही बसला आहे. प्लॅस्टिक कागद व बॅनर प्रामख्याने गरीब व सामान्य कुटुंबातील नागरीक व शेतकरी खरेदी करीत आहेत.'' - हमीद अहमद, मालेगाव

Web Title: Demand Increase For Plastic Paper In Malegaon Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top