नाशिक- राज्यभरातील जिल्हा रुग्णालये, पालिका रुग्णालयांतील मृतदेह वाहून नेण्यासाठी नवीन १०० शववाहिन्या घेण्यात आल्या. कित्येक महिने या शववाहिन्या पुण्यात धूळखात पडून होत्या. त्याबाबत चर्चा झाल्यावर त्या राज्यभरात पाठविण्यात आल्या असून, आता त्या जिल्ह्याच्या ठिकाणी काही आठवड्यांपासून धूळखात पडून आहेत. या नवीन शववाहिन्यांचे वाटप करण्याबाबत निर्णयच शासनाने जारी केलेला नाही. या प्रतीक्षेत या नवीन शववाहिन्या धूळखात पडून आहेत.