सिन्नर- जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठी पाळणा कमी दरात उपलब्ध होणे गरजेचे आहे. अथवा शासकीय स्तरावर प्रत्येक गावात पाळणा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी केली आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांना निवेदन दिले आहे.