Nashik News: नाशिकमार्गे जाणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचे काम सुरू करण्याची मागणी

meeting
meetingesakal

Mumbai-Nagpur Bullet Train : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनमुळे नाशिकसह राज्यातील सुमारे अकरा जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असून, या विषयीचा डीपीआर वर्षभरापूर्वीच तयार झालेला आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ निम्म्याहूनअधिक कमी होणार असू,न ट्रेनमुळे दहा जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

नाशिकमार्गे जाणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या विकासासाठी एक वरदानच ठरणार असल्याने प्रास्तावित रेल्वेमार्गाला केंद्राकडून मान्यता मिळवून लवकरात लवकर प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ करावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडचे सीएमडी प्रसाद यांच्याकडे केली. (Demand to start work of Mumbai Nagpur bullet train passing through Nashik Nashik News)

मुंबई -नागपूर प्रवास रेल्वेमार्गाने जलद गतीने व्हावा, यासाठी विशेष बुलेट ट्रेन रेल्वेमार्ग तयार करावा, अशी मागणी सतत राज्यभरातील रेल्वे प्रवाशांकडून केंद्र शासनाकडे होत होती.

पंतप्रधान मोदी यांनी देशभरात सात ठिकाणी बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून, या प्रकल्पाचा डीपीआरही पूर्ण झालेला आहे. असे असले तरी सदर प्रकल्पास आजमितीस केंद्राकडून अंतिम मान्यता मिळालेली नसून प्रस्ताव प्रलंबित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

meeting
Nashik: भाजपच्या मंत्र्यांनी मंजूर केलेली 133 कोटींची कामे रद्द होण्यावर; केवळ 353 कामांसाठीच निधीची हमी

बुलेट ट्रेनचा विषय मार्गी लागावा, यासाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जात नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडचे सीएमडी प्रसाद यांची भेट घेतली.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनमुळे नाशिकसह अकरा जिल्हे एकमेकांना जोडले जाणार असून, यामुळे पर्यटनासह विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या वेळी खासदार गोडसे यांनी प्रसाद यांच्याकडून यापूर्वी मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन संदर्भातील तयार करण्यात आलेल्या डीपीआरची सविस्तर माहिती घेतली.

संबंधित ट्रेनचा मार्ग नागपूर, वर्धा, पुरगाव, करंजा, मेहेकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरीमार्गे सीएसटी, असा असणार असल्याची खासदार गोडसे यांनी माहिती दिली.

meeting
Chhagan Bhujbal: जिल्हा बॅंक, पतसंस्थांचे प्रश्न सोडविणार : छगन भुजबळ यांची ग्वाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com