ध्वजारोहणाच्या धावपळीत डेंगी मृत्यूंचे डेथ ऑडिट रखडले

ध्वजारोहणाच्या धावपळीत डेंगी मृत्यूंचे डेथ ऑडिट रखडले
Published on: 
टूडे साठी --------------- डेंगी मृत्यूंचे ऑडिट रखडले तापाची साथ; १० महिन्यात ६५ हजार रुग्ण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीत प्रशासन गुंतल्याने डेंगीसदृश आजाराने झालेल्या दोन संशयित मृत्यूंचे डेथ ऑडिट लांबणीवर पडले आहे. अंबड लिंक रोडवरील विनोद लखीराम मडैया (वय १७) याचा ऑक्टोबरमध्ये तर पाथर्डीतील एका युवतीचा सप्टेंबरमध्ये डेंगीसदृश लक्षणांनी मृत्यू झाला होता. महिनाभर उलटूनही या दोन्ही मृत्यूंचे कारण निश्चित झालेले नाही. दुसरीकडे शहरात तापसदृश आजाराने थैमान घातले आहे. केवळ ऑक्टोबरमध्येच ८,७८० रुग्णांची नोंद झाली असून जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या १० महिन्यात हा आकडा ६५,७८० वर पोहोचला आहे. ही आकडेवारी केवळ महापालिकेच्या दवाखाने आणि शहरी आरोग्य केंद्रातील असून खासगी रुग्णालयातील संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत १८२ डेंगी रुग्ण होते, ऑक्टोबरमध्ये महिन्यात १३९ रुग्ण वाढल्याने एकूण संख्या ३२१ वर गेली आहे. जानेवारी ते जुलै या महिन्यात स्वाइन फ्ल्यूचे २८ रुग्ण आढळले. ऑगस्ट महिन्यात ११९, सप्टेंबर १८३, तर ऑक्टोबरमध्ये २९ रुग्ण आढळले आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने ऑक्टोबरमध्ये स्वाइन फ्लू आटोक्यात आला आहे. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.