Unseasonal Rain : सोने गहाण ठेवुन पिकविलेल्या कांद्याची नासाडी; आवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात

Tope Kuntubiya while picking onions from chali soaked by untimely rains
Tope Kuntubiya while picking onions from chali soaked by untimely rainsesakal

Unseasonal Rain : कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

एकीकडे कांद्याला बाजार भाव नाही, तर दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसात काढून ठेवलेला कांदा ओला झाल्याने सडू लागला असून, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. (Destruction of onions grown by mortgage of gold; Farmers in trouble due to heavy rains nashik news)

लासलगाव जवळील पिंपळद (ता. चांदवड) येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय निवृत्ती टोपे यांनी अडीच एकरात उन्हाळ कांद्याचे पिक घेतले. त्यासाठी त्यांनी ७० हजार रुपये पिक कर्ज आणि पत्नीचे मंगळसूत्र व सोन्याचे अन्य दागिने बँकेत गहाण ठेऊन सोनेतारण कर्ज घेतले होते.

पोटच्या मुलाप्रमाणे संगोपन केलेले उन्हाळ कांद्याचे पिकही जोमदार आले. कांदा काढणीला सुरवात झाली अन्‌ कांद्याचे बाजार भाव कोसळले. त्यामुळे त्यांनी बाजारभाव वाढतील तेव्हा हा कांदा विक्री करू, या हेतूने चाळीमध्ये साठवण्यासाठी सुरवात करण्याआधीच अस्मानी संकट कोसळले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Tope Kuntubiya while picking onions from chali soaked by untimely rains
Unseasonal Rain Damage : कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादकही हतबल! उत्पादन खर्चही फिटेना

तीन ते चार दिवस सलग गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. यामध्ये काढून ठेवलेला आणि शेतातील कांदा ओला झाल्याने सडू लागला आहे.

दहा ते पंधरा टक्केही कांदा हातात येणार नसल्याने, उत्पादन खर्च तर दूरच; वाहतूक आणि मजुरीही निघणार नसल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. या अस्मानी संकटाने संपूर्ण स्वप्नांवर पाणी फिरवल्याचे कांदा उत्पादक शेतकरी श्री. टोपे सांगत आहेत.

Tope Kuntubiya while picking onions from chali soaked by untimely rains
Unseasonal Rain : गारपिटीने 658 कोटींच्या पिकांची धूळधाण! बागलाणचे ५३ टक्के नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com