देवळा प्रारूप विकास आराखड्याला नागरिकांकडून हरकती; संबंधित विभागाविरोधात नागरिकांसह नगरपंचायत न्यायालयात धाव घेणार

देवळा प्रारूप विकास आराखड्याला नागरिकांकडून हरकती; संबंधित विभागाविरोधात नागरिकांसह नगरपंचायत न्यायालयात धाव घेणार
Published on: 
पान चार ------------------- देवळा प्रारूप विकास आराखड्याला तीव्र विरोध; १७६ हरकती दाखल, बदल न झाल्यास न्यायालयात जाण्याचा नागरिकांचा पवित्रा सकाळ वृत्तसेवा देवळा, ता.१३ : नगरपंचायत हद्दीतील प्रारूप विकास योजनेंतर्गत सहसंचालक नगररचना विभाग (नाशिक) यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला विद्यमान जमीन वापर नकाशा मागील महिन्यात २७ ऑक्टोबरला नगरपंचायतीत प्रसिद्ध करण्यात आला होता. यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १३) नगरपंचायत कार्यालयात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत देवळा शहराच्या या प्रारूप विकास आराखड्याबाबत नगरपंचायतीकडे तब्बल १७६ हरकती प्राप्त झाल्या. यात बहुसंख्य नागरिकांनी या आराखड्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. आराखड्यात योग्य बदल न केल्यास हा प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी नागरिकांसह नगरपंचायत न्यायालयात जाऊन तो रद्द करण्यात यावा, असा एकमुखी निर्णय या वेळी घेण्यात आला. या बैठकीसाठी नगरविकास विभागाच्या अपूर्वा डोळे, नाफेडचे संचालक केदा आहेर, बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर आदींसह नागरिक उपस्थित होते. नगररचना विभागाने देवळा नगरपंचायत हद्दीतून अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकून अन्याय झाल्याचे नागरिकांच्या या हरकतींवरून दिसून आले. यात अनेक शेतामधून १२ ते ३० मीटर पर्यंतचे रिंग रोड दाखविण्यात आले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या जागेवर शैक्षणिक आरक्षण, वाणिज्य आरक्षण, मोकळे भूखंड अशा प्रकारचे आरक्षण लादण्यात आले आहे. सदरचा आराखडा मंजूर करत असताना शासनाकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदरचा आराखडा तयार करण्यात आल्याने प्रचंड रोष निर्माण झाले असून त्याचे पडसाद हरकतीद्वारे मांडण्यात आले आहेत. यामुळे नगरपंचायत कार्यालयात नागरिकांकडून असंतोष व्यक्त होताना दिसून आला. देवळा शहरातून जाणारा विंचूर-प्रकाशा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच झाला असल्याने त्याठिकाणी महामार्गालगतच्या गावठाण हद्दीतील इमारतींना सीमांकन केल्याने व्यापारी बांधवांमध्येही मोठा रोष निर्माण झाला असून समोर शासकीय जागा उपलब्ध असताना देखील गावठाण हद्दीतील पक्क्या इमारतींना सीमांकन कसे केले असा सवाल उपस्थित केला जात आहे. --------- सदरचा प्रस्ताव रद्द करण्याकामी आमदार डॉ.राहुल आहेर यांचे समवेत आपण प्रयत्नशील राहू. मुदतीच्या आता सर्व नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवा. केदा आहेर, संचालक, नाफेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.