Nashik News: दरेगावाने दाखवली सामाजिक बांधिलकी; ‘एक हात मदतीचा’द्वारे कुटुंबाला अर्थसहाय्य

President of the society Sanjay Gangurde and others while handing over the assistance check to the Pagar family.
President of the society Sanjay Gangurde and others while handing over the assistance check to the Pagar family.esakal

Nashik News : नियतीची चक्रे कधी आणि कुणावर फिरतील, याचा नेम नाही. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून अशा कुटुंबाला काही ना काही मदत करण्याचा प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला तर असे कुटुंब पुन्हा नव्या जोमाने उभे राहू शकते, याचा प्रत्यय नुकताच आला.

तालुक्यातील दरेगावात जिजाबाई नामदेव पगार यांचे नुकतेच निधन झाले होते. या कुटुंबावर काळाने झडप घातली. दोन वर्षांपासून पगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. कुटुंबप्रमुख नामदेव किसन पगार यांचे कोरोनात निधन झाले.

त्यानंतर लगेच त्यांचा एकुलता मुलगा भागा नामदेव पगार यांचे आजारामुळे निधन झाले. मुलाला एक वर्षही होत नाही, तर मंगळवारी (ता. २६) जिजाबाई पगार यांचे निधन झाले. (devargaon Shows Social Commitment Financial assistance to family through helping hand Nashik News)

या कुटुंबात कर्ते पुरुष व कमावते हात काळाने हिरावून घेतल्याने (कै.) भागा पगार यांच्या तीन लहान मुलांवर मोठे संकट कोसळले. आता कुटुंबाची जबाबदारी वनिता भागा पगार यांच्यावर आली.

अशा वेळेस समाजाचं देणं लागतो म्हणून आपण अशा कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहणे ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वांची जबाबदारी आहे.

त्यासाठी ‘एक हात मदतीचा’ हा छोटासा उपक्रम राबविण्याचा मानस सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय गांगुर्डे व विक्रम देवरे यांनी व्यक्त केला व त्याला अनुसरून ज्यांना या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा असेल, त्यांनी मदत करण्याचे आवाहन व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे करण्यात आले.

President of the society Sanjay Gangurde and others while handing over the assistance check to the Pagar family.
Success: वांगे, पपईने दिली लाखमोलाची साथ! जिद्द, चिकाटीच्या जोरावर ब्राह्मणगावच्या युवा शेतकऱ्याच्या प्रयत्नांना फळ

अशा रीतीने वनिता पगार यांच्या लहान मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून छोटासा उपक्रम राबविण्यात आला. अनेकांनी प्रतिसाद देऊन आपापल्या परीने योगदान दिले. एकूण २७ हजार रुपयांच्या निधीचे संकलन झाले.

या वेळी संजय गांगुर्डे, विक्रम देवरे, पोलिसपाटील सोमनाथ गांगुर्डे, अनिल गव्हाणे, सुधाकर धिवर, विक्रम पगार, दत्तू पगार आदी उपस्थित होते.

या उपक्रमात योगदान देणाऱ्यांमध्ये बी. एस. व्हडगर (सचिव), संजय बाबाजी गांगुर्डे, भाऊसाहेब रामदास देवरे (पुणे), अर्जुन श्रावण गव्हाणे, प्रवीण अशोक देवरे, सोमनाथ बबन गांगुर्डे (पोलिसपाटील), विक्रम कारभारी देवरे, हिरामण दादाजी शेळके, पवन अशोक गरुड, रामदास बाबूराव गांगुर्डे (महाराष्ट्र पोलिस, नाशिक), दादाजी उत्तमराव अहिरे (नाशिक), सुधाकर शंकर धिवर, अर्जुन श्रावण गव्हाणे, अशोक पोपट गांगुर्डे यांचा समावेश आहे.

President of the society Sanjay Gangurde and others while handing over the assistance check to the Pagar family.
Nashik News: खैरगव्हाण सरपंचपदी माया पोटे विजयी! राजकीय गटबाजीत समान मते मिळाल्याने चिठ्ठीत उघडले नशीब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com