गौरव जोशी : कोणत्याही जिल्ह्याची ओळख ही तेथील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रामुळे व पायाभूत सुविधांवरून होत असते. कुंभनगरी नाशिक सध्या त्यास अपवाद आहे. सत्ताधाऱ्यांमधील पालकत्वाच्या वादामुळे चार महिन्यांपासून जिल्ह्याच्या विकासात खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कुंभाच्या निमित्ताने विकासाची स्वप्ने रंगविणाऱ्या नाशिककरांची घोर निराशा होत आहे.